News & Events

'रंगीला रे' चित्रपटात साकारणार भूमिका

२००८ मध्ये झी मराठीवर रंगलेल्या ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेली आर्या आंबेकर आता लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात समोर येणार आहे. गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आर्या आता अभिनयातही नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. मूळची नागपूरची असलेली आर्या ‘रंगीला रे’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.